🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्याच्या काळात टेलिकॉम क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न टेलिकॉम कंपन्या करत आहेत. मात्र तरी देखिल या सेवांची उच्चतम पातळी ग्राहकांना भावते आणि कंपन्यांकडून विविध ऑफर्सही ग्राहकांना काही काळापुरत्या असतात मात्र ग्राहकांना अतिमतः विना अडथळा सेवा देणारे नेटवर्क ऑफर्स च्या तुलनेत जास्त आकर्षित करतात.
टेलिकॉम कंपन्या अधिकाधिक युझर्स जोडण्यावर भर दिला आहे. नंबर पोर्ट करण्याच्या सुविधेमुळे नेटवर्क प्रोव्हाइडर बदलणे सोपे झाले आहे. याचा फायदाही हजारो ग्राहक घेत आहेत. टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने नवीन सब्सक्राइबर्समध्ये जिओवर मात करीत नंबर वन स्थान पटकावले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) डेटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०२० च्या डेटावरून एअरटेलने नोव्हेंबरमध्ये ४३ लाख नवीन मोबाइल युझर्स जोडले. व्होडाफोन-आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड नोव्हेंबर महिन्यांत आपले अनेक ग्राहक गमावले आहेत.
दरम्यान, देशात 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत एअरटेलने रिलायन्स जिओला पिछाडले आहे. भारती एअरटेलने 5G ची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाइव्ह केली. 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर आपेगावकर
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- तीन दशकांपासूनच्या अतिक्रमणावर मनपाची कारवाई
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही त्यांचा निषेध करतो- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

