🕒 1 min read
बीड : सुप्रसिध्द पखवाजवादक पंडित उद्धवबापू आपेगावकर यांची शासनाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आपेगावकर हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत. त्यांच्या परिवारात उत्कृष्ट पखवाज वादनाची परंपरा आहे.
राज्य शासनातर्फे दिला जाणारा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार देशातील अंत्यंत नामवंत शास्त्रीय गायक, वादक कलाकारांना देण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानचिन्ह, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आणि युवा शिष्यवृत्ती निवड समितीचे नुकतेच पुनर्गठन करण्यात आले.
यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित उद्धवबापू आपेगावकर, श्रीनिवास जोशी, डॉ. राम देशपांडे, फैय्याज हुसेन खॉ साहेब यांची निवड करण्यात आली आहे. आपेगावकर यांनी आपल्या पखवाज वादनाच्या कलेतून जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची निवड केली आहे. आपेगावकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय रिझर्व बँकेत नोकरी मिळवण्याची संधी ! आजच अर्ज कारा !
- इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी विराट कोहली सज्ज, पहा व्हिडिओ
- धनगर आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नव्हे तर अस्तित्वाची लढाई-गोपीचंद पडळकर
- फूडपार्क प्रस्ताव अडकला लालफितीत; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा
- त्वरा करा ! मोफत एलपीजी सिलेंडर मिळवण्याचा आज शेवटचा दिवस


