औरंगाबाद : किलेअर्क येथील नाल्याजवळ महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा मागील तीन दशकांपासून अतिक्रमित होती. बाजार मूल्यानुसार तीन कोटी रुपयांची ही जागा आज महापालिकेने मोठ्या पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेतली. अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी प्रारंभी कडाडून विरोध केला. मात्र अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई पूर्ण केली.
सिटी चौक ते किलेअर्कपर्यंत १५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून रस्ता आणि ब्रिज उभारण्यात येत आहे. पंचकुंआ कब्रस्तान जवळील पुरातन काळातील ब्रिजच्या बाजूला लागून महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा होती. येथे चारही बाजूने लोखंडी पत्रे लावून आत भंगार, लाकूड आदी सामान ठेवण्यात आले होते. महापालिकेने आपल्या मालकीची जागा ताब्यात घ्यावी म्हणून या भागातील दोन नागरिक वर्षभरापासून पाठपुरावा करीत होते.
त्यानुसार मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन शुक्रवारी (दि.२९) सकाळी अतिक्रमण हटाव विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिक्रमण करणाऱ्या शेख ईलियास या व्यक्तीने कडाडून विरोध दर्शविला. महापालिकेने अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण करून ही जागा आपल्या मालकीची आहे किंवा नाही याची शहानिशा केली होती. जागा ताब्यात घेण्यास विरोध होत असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या एक तासात जागेचा ताबा घेतला.
जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद, पी.बी. गवळी, मालमत्ता विभागाचे मोईन अली, महापालिकेचे पोलीस पथक यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते मोक्षदा पाटील यांचा गौरव
- ‘अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा; त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अण्णांचा आभारी’
- ‘अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा; त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अण्णांचा आभारी’
- ‘…तर खेळाडू मानसिकदृष्ट्या आजारी पडतील’ ; खेळाडूंबद्दल व्यक्ती केली चिंता!
- देवीचे तुळजापूर हादरले! नववीच्या विद्यार्थिनीला पळवून नेत सामूहिक अत्याचार


