🕒 1 min read
सोलापूर:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली आहे.
त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना फटकारले आहे. कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
महत्वाच्या बातम्या
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर आपेगावकर
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- महत्वपूर्ण निर्णय ! दुसरी पत्नी देखील पतीच्या पेन्शनची वारसदार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

