उस्मानाबाद: कोरोनासंर्भातील निर्बंध शिथिल होताच नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल झाले म्हणजे कोरोना गेला असे काही नागरिकांना वाटते आहे, मात्र कोरोनाचे संकट अजूनही गेले नाहीये हे लक्षात घेऊन स्वतःची काळजी घेणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील तुळजापूर येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे मात्र तरीही आता भाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी करायला सुरुवात केली आहे. भाविकांची वर्दळ सुरू होताच परिसरातील अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत, मात्र कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारामध्ये नवीन परड्या, पोत घेणे आणि महाद्वारासमोरूनच दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अनेक महिन्यांपासून मंदिर बंद आहे त्यामुळे येथील नागरिकांकडून तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून देखील मंदिर उघडण्याबाबत निवेदनं देण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने मंदिर उघडण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
शहरातील हॉटेलमधील वर्दळही वाढल्याचे दिसले. कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मंदिर बंद असल्याने प्रशासनाचा भाविकांशी थेट संबंध येत नाही. तथापि, वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर आहे. भाविकांची होणारी ही गर्दी म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेल दिलेले आयते निमंत्रण ठरेल अशी भीती अनेक सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल.
महत्वाच्या बातम्या
- २६ जूनचे ‘चक्का जाम’ आंदोलन भाजपमधील ओबीसी नेत्यांनी प्रतिष्ठेचे का बनवले आहे ?
- डब्ल्युटीसी फायनल! ११ धावांची खेळी करताना टेलरने नोंदवला ‘हा’ विक्रम
- अर्धशतक हुकले पण केन विलियमसनने मोडला फ्लेमिंगचा ‘हा’ विक्रम
- आयपीएल २०२१च्या उर्वरीत स्पर्धेतुन ‘या’ दिग्गज खेळाडूंने घेतली माघार
- संथ खेळीमुळे सेहवागने विलियमसनला केले ट्रोल, शेअर केले ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

