Share

डब्ल्युटीसी फायनल! ११ धावांची खेळी करताना टेलरने नोंदवला ‘हा’ विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावांची मजल मारली. मात्र या सामन्यात न्युझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू रॉस टेलर केवळ ११ धावावर बाद झाला. मात्र या खेळीत त्याने चौथी धाव घेताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगीरी करणारा तो न्युझीलंडचा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या पाठोपाट न्युझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५२८९ धावा केल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने १५१५६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त न्युझीलंडच्या एकाही खेलाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५००० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही.

या सामन्यातील अखेरच्या दिवशी भारतीय संघ २ बाद ६४ धावांवरुन पुढे खेळणार आहे. न्युझीलंड संघाला विजयासाठी भारतीय संघाला लवकर बाद करावे लागेल. तसेच भारतीय संघाने दिलेले लक्ष्यही गाठणे गरजेचे आहे. मात्र एकाच दिवसात हे होण्याची शक्यता फार कमी असल्याने हा सामना अनिर्णीत राहील असा अंदाज क्रिकेटरसीक व्यक्त करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!