मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.
या सामन्यात न्युझीलंडकडुन कर्णधार केन विलियमसनने दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधीक खेळी केली. मात्र त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र त्याने या सामन्यात न्युझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगचा कसोटी सामन्यात सर्वाधीक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. स्टिफन फ्लेमिंगने नावे कसोटी क्रिकेटमध्ये न्युझीलंडकडुन ७१७२ धावा केल्या होत्या. तर डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ४९ धावांच्या खेळीमुळे विलियमसनच्या एकुण धावा ७१७८ धावा झाल्या आहेत.
49. Kane Williamson goes after popping an edge to Virat Kohli at 2nd slip from Ishant Sharma. During his innings he became NZ's second highest Test run scorer moving ahead of @SPFleming7 (7172). The lead is 4 as Wagner joins Southee 10* Card | https://t.co/9M1mvODiZ3 #WTC21 pic.twitter.com/4Vp1TGqThF
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 22, 2021
फ्लेमिंगने १११ कसोटीतील १८९ डावांत ७१७२ धावां केल्या होत्या. तर केन विलियमसनने ही किमया ८५ कसोटी सामन्यात साधली आहे. ८५ कसोटी सामन्यात केनने १४७ डावात ही किमया साधली. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये न्युझीलंडकडुन सर्वाधीक धावा करणाऱ्या खेळाडुंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी न्युझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर हा आहे. रॉस टेलरने १०८ कसोटीतील १८८ डावांत फलंदाजी करताना ७५१७ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धमाकेदार कामगिरी नंतर चेन्नई सुपर किंग्सने ट्विट करत केले शमीचे कौतुक
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा


