🕒 1 min read
औरंगाबाद : ‘ब्रेक-द-चेन’ अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये सवलत मिळताच हवे ते, नको त्या, सर्वच स्थापना एकाचवेळी सुरु झाल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळत आहे, त्यात प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये सवलत देतांना गेल्यावर्षी प्रमाणे दुकानदार व ग्राहकांना नियम घालुन न दिल्याने लवकरच तिसर्या लाटेची संभावना निर्माण होत आहे.
लाॅकडाऊनमध्ये सवलत मिळताच प्रथमतः नागरीकांनी कापड दुकान व साराफा बाजारातच मोठी गर्दी केली आहे, शासन नियमाप्रमाणे सर्वच व्यापारपेठ दुपारी दोनच्या ठोक्याला बंद होत असली तरी दुकानात म्हणा अथवा शासकीय कार्यालय, बॅका कुठेच कोररोना नियमाचे पालन होतांना दिसत नाही व नियम पाळण्याची प्रशासनाकडून सक्ती देखील होत नसल्याने नागरीक पण स्वैर व बिनधास्त वागत आहे.
तसेच दुपारी दोन नंतर नाका रोड व उद्यानरोडवरी भाजी पाल्याचे दुकाना सुरुच राहत असल्याने या ठिकाणी देखील मोठी गर्दी होत आहे, लाॅकडाऊनमध्ये सवलत देतांना प्रशासनाने काही अस्थापनांना सवलती दिल्या नसल्या तरी पण त्या दुकाना उघड्या राहत आसल्याने असे वाटत आहे की, आता कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामी येते की काय ? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
