Share

मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांच्या हट्टामुळे करोडो रुपये वाया जाणार, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही.

आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतल्या मेट्रो 3 ची कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलच तोंडसुख घेतलं आहे. आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट.. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले, असं टि्वट निलेश राणे यांनी करीत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे.“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत” असा आरोप भातखळकर यांनी केला. मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे जनतेचं दिवसाला पाच कोटी रुपयांचं नुकसान होत आहे असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!