मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, मुंबईच्या चिंतेत अजून एक भर पडली असून अवघी मुंबई वीजसंकटात सापडली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
उपनगरांमध्ये काही भागात वीज आली असली तरी अजून तासाभराची मुंबईकरांना करावी लागेल असं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. “महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली. याचमुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कॅपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
https://twitter.com/ashokepandit/status/1315529008927305733?s=20
https://twitter.com/ashokepandit/status/1315528435943395331?s=20
एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल.” अशी माहिती राऊत यांनी दिली आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. सरकारवर आता सर्व स्थरातून टीका होत असून दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ”महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका केलीय. यासाठी ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही अशी अपेक्षा. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण आहे,” असे पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटले आहे.
दरम्यान, यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. “राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.”अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- Bihar Election 2020 : भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

