🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईत ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांच्यासोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनाम घेण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने लावून धरलेली होती. आता मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपत नेते मालिकांवर चांगलेच आक्रमक झाले आहे. राजीनामा मागणीसाठी भाजप रस्त्यावर जाऊन आंदोलन करणार, फडणवीस यांनी जाहीर केले आहे. भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ९ मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्न सोडविणार असा इशाराही दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या विधीमंडळात सरकारला मान्य करायला आम्ही भाग पाडू असा निर्धार केला आहे. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोस्ताहनपर अनुदान देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्यात यावी, एकरकमी एफआरपी मिळावी इ. मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे फडणवीस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
