Share

IND vs SL: धमाकेदार ९६ धावांची खेळी केल्यानंतर दिग्गजांकडून ऋषभ पंतचे कौतुक!

Published On: 

मुंबई: भारताची श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी मोठे योगदान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (rishabh pant) दिले आहे. त्याने ९६ धावांची झुंजार खेळी केली. मात्र पुन्हा एकादा त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्यानंतर तो निराश दिसला मात्र माजी खेळाडूंनी ऋषभ या खेळीसाठी कौतुक केले आहे.

हनुमा विहारी आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने भारताची खेळी सांभाळली. त्याने ९७ चेंडूत धुव्वादार ९६ धावा केल्या ज्यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.पंतने लंकन गोलंदाजांना हैराण करून सोडले. एम्बुल्डेनियाच्या षटकातून त्याने तब्बल २२ धावा मिळवल्या. ९० च्या आकड्यात त्वरीत प्रवेश करताना पंत नेहमीसारखा तिहेरी आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज दिसत होता. तथापि, सुरंगा लकमलने (suranga lakmal) टाकलेल्या ८१ व्या षटकात पंत क्लीनबोल्ड झाला आणि त्याचे शतक पुन्हा हुकले. वसीम जाफर , मायकल वॉन सारख्या दिग्गजांनी ट्विटरवरून ऋषभच्या खेळाची प्रशंसा केली आहे.

ऋषभ पंतच्या हुकलेल्या शतकात राजकोट २०१८ मध्ये वेस्ट इंडिज ९२ , हैदराबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ९२, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९७ , चेन्नई मध्ये इंग्लंड विरुद्ध ९१ आणि आता मोहाली मध्ये लंकेविरुद्ध ९६ यांचा समावेश आहे. पंतने लंकन गोलंदाजांना हैराण करून सोडले. एम्बुल्डेनियाच्या षटकातून त्याने तब्बल २२ धावा मिळवल्या. ९० च्या आकड्यात त्वरीत प्रवेश करताना पंत नेहमीसारखा तिहेरी आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज दिसत होता. तथापि, सुरंगा लकमलने टाकलेल्या ८१ व्या षटकात पंत क्लीनबोल्ड झाला आणि त्याचे शतक पुन्हा हुकले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!