मुंबई: भारताची श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी हनुमा विहिरीने अर्धशतक केले तर १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीनेही ४५ धावांची खेळी केली. मात्र यात सर्वात मोठे योगदान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दिले आहे. त्याने ९६ धावांची झुंजार खेळी केली मात्र पुन्हा एकदा त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले.
हनुमा विहारी (hanuma vihari) आणि विराट कोहली (virat kohli) बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने (rishabh pant) भारताची खेळी सांभाळली. त्याने ९७ चेंडूत धुव्वादार ९६ धावा केल्या ज्यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. २०१८ पासून ऋषभ पंतने नर्व्हस नाईंटीममुळे गमावलेले हे ५ वे शतक होते. शतक हुकल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये परततांना ऋषभ निराश दिसला. त्याला आपण शतक करण्याआधीच बाद झालो आहोत यावर विश्वास बसत नव्हता. इतकेच काय तर ड्रेसिंग रूम मध्ये रोहित शर्माच्या शेजारी बसलेला त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ऋषभ रडकुंडीला आलेला दिसत आहे.
Dil chhota na kar Rishi.. all our love to you! ???? You were magnificent. ????@RishabhPant17 https://t.co/OtNcN1z3SX
— Jassi Jaisa Koi Nahi ♥️ (@mahiratxmahirit) March 4, 2022
ऋषभ पंतच्या हुकलेल्या शतकात राजकोट २०१८ मध्ये वेस्ट इंडिज ९२ , हैदराबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ९२, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९७ , चेन्नई मध्ये इंग्लंड विरुद्ध ९१ आणि आता मोहाली मध्ये लंकेविरुद्ध ९६ यांचा समावेश आहे. पंतने लंकन गोलंदाजांना हैराण करून सोडले. एम्बुल्डेनियाच्या षटकातून त्याने तब्बल २२ धावा मिळवल्या. ९० च्या आकड्यात त्वरीत प्रवेश करताना पंत नेहमीसारखा तिहेरी आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज दिसत होता. तथापि, सुरंगा लकमलने टाकलेल्या ८१ व्या षटकात पंत क्लीनबोल्ड झाला आणि त्याचे शतक पुन्हा हुकले.
महत्वाच्या बातम्या
- OBC Reservation : प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- “खंडणी, वाजे, नबाब मलिक हीच या सरकारची ओळख”, केशव उपाध्येंचा टोला
- IND vs SL: काय सांगता! विराट कधी आणि किती धावांवर बाद होणारा ठरल होत; ट्विट होतंय व्हायरल
- “राज्यपालांच्या खांद्यावर फडणवीसांची बंदूक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- “सत्ता गेली याचा इतका राग…”, संजय राऊतांचा भाजपला जोरदार टोला


