Share

बेन स्टोक्स स्पर्धेतून बाहेर, ‘या’ चार खेळाडूंपैकी एकाची लागू शकते संघात वर्णी

Published On: 

मुंबई : सोमवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ४ धावांनी पराभव करत आयपीएलमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यातील पराभवातुन सावरण्याआधी राजस्थानच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा हुकमी एक्का मनाला गेलेला खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

सोमवारी राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना त्याला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच त्याला उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे.राजस्थान संघाचा दुसरा सामना हा गुणतालीकेत पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपीटलसोबत गुरुवारी आहे. मात्र या सामन्याआधी राजस्थानच्या चाहत्यासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनंतर आता संघाचा महत्वाचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. महत्वाच्या खेळाडुच्या अनुपस्थितीमुळे राजस्थाच्या संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवॉन कॉन्वे, थिसारा परेरा, एरॉन फिंच, किंवा अॅलेक्स हेल्स यापैकी एका खेळाडूला आपल्या ताफ्यात राजस्थान घेवू शकते अशी माहिती समोर येत आहे. यासर्व खेळाडूंनी मागील काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदाच्या खेळाडू लिलावात कोणत्याही संघाने या खेळाडूंना खरेदी केले नाही यामुळे यापैकी एकाला संघात घेण्याचा विचार राजस्थान करू शकेल.

राजस्थानला स्टोक्सची जागा घेण्यासाठी अष्टपैलू खेळाडू हवा असल्यास ते श्रीलंकेच्या थिसारा परेराला पसंती देऊ शकतील. सलामीविराचा विचार झाल्यास ऑस्ट्रेलियाचा कर्णधार  फिंचचा पर्याय आहे. सोबतच इंग्लंडचा सलामीवीर हेल्सला देखील राजस्थानचा संघ आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!