Share

अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका, ही तर भाजपची केविलवाणी धडपड- नीलम गोऱ्हे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आपले अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केली.

विधानपरिषदेच्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही,” असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केले. भाजपच्या टीकेला उत्तर देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “स्वत:चे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे. नागपूर आणि पुणे ही दोन मतदारसंघं दीर्घकाळापासून भाजपकडे होती. या मतदारसंघांतही महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना विजय मिळाला आहे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!