🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन नेहमीच त्याच्या रांगडेपणासाठी ओळखला जातो. त्याचे टोपननावही ‘गब्बर’ आहे, यावरुन त्याच्या रांगडेपणाची ओळख पटू शकते. त्याच्या नावाप्रमाणेच त्याचा खेळण्याचा अंदाजही आक्रमक आहे. अशा या भारतीय क्रिकेटपटूची प्रेमकहाणीही अनोखीच आहे.
भारतीय संघाकडून खेळण्यापुर्वी धवन हा इंडिया मास्टर्सकडून खेळला आहे. मे 2005मध्ये अबू दाबी येथील त्सुनामी रिलिफ स्पर्धेत पाकिस्तान मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्सविरुद्ध तो खेळला होता. 2005मधील चॅलेंजर ट्रॉफीत धवनने एमएस धोनीसोबत वरिष्ठ भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी धोनीला 3 वनडे सान्यांचा अनुभव होता. तर, धवन हा अवघ्या 19 वर्षांचा होता. यावेळी दोघांनी मिळून 187 धावांची भागिदारी रचली होती.
2008मध्ये धवनला आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्समध्ये स्थान मिळाले होते. पण दिल्लीने आशिष नेहरासोबत त्याची अदलाबदल केली होती. पुढे 2009-10मध्ये तो मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला. धवनला युवा वयापासून बाईक्सची आवड होची. त्याच्याकडे इनफिल्ड ही बाईक आहे. तर 2010मध्ये त्याने स्वॅन्की सुझुकी हयाबुसा ही बाईक विकत घेतली. धवनच्या शरीरीवर बरेच टॅट्यू आहेत. विना पानांचे झाड, कार्प डायम कोट अशा टॅटूंचा यात समावेश आहे.
धवनला त्याचे संघसहकारी जट-जी म्हणतात. तसेच त्याला गब्बर असेही म्हणतात. त्याच्या लूकमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकत्त्व असणारी ऍंग्लो इंडियन बॉक्सर आयेशा मुखर्जी हिच्याशी धवनने लग्न केले. तिला पहिल्या 2 मुली होत्या. हरभजन सिंगने धवन आणि आयेशाची फेसबुकद्वारे ओळख करून दिली. त्यांना 2014मध्ये जोरावर नावाचा मुलगा झाला.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

