Share

मंजूर प्रकल्प थांबवणारे राजेश टोपे वांझोटे मंत्री, बबनराव लोणीकर यांची जहरी टीका

Published On: 

जालना : जालन्याचे विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे आणि आधीचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वाद कायमच चर्चेत असतो. पालकमंत्री राहिलेले आमदार बबनराव लोणीकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर जहरी टीका केलीय. जिल्ह्यात सुरू असलेला प्रकल्प थांबवणारे राजेश टोपे हे वांझोटे मंत्री असल्याचे लोणीकर म्हणाले.

वास्तविक लोणीकर पालकमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मतदार संघात १३२ के.व्ही. चे केंद्र मंजूर केले होते. त्या केंद्राचे कामही सुरू होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्यांनी लोणीकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेला हा प्रकल्प आपल्या मतदार संघात स्थलांतरीत केला असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे.

लोणीकर यांनी आरोप करताना टोपे यांच्यावर जहरी टीका केलीय. राजेश टोपे विकासाच्या बाबतीत वांझोटे मंत्री असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे. तांत्रिक दृष्ट्या हे केंद्र नेर या ठिकाणीच होणे योग्य आहे. मात्र, राजेश टोपे यांनी या कामाध्ये मिठाचा खडा टाकला असल्याचे लोणीकर म्हणाले. यामुळे टोपे विरुद्ध लोणीकर यांच्यातील सामना पुन्हा एकदा रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!