मुंबई : रविवारी तोक्ते चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रासह चार राज्यांवर घोंघावू लागले आहे. कोकणातरत्नागिरी आणि किनारपट्टीच्या भागात शनिवारी संध्याकाळपासून पावसाला सुरूवात झाली. या वादळाचा तडाखा सर्वप्रथम केरळला बसला. तेथे वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा जनजीवनाला बसला.
तोक्ते चक्रीवादळ हे अखेर धडकलं असून, कोकण किनारपट्टी भागात याचे परिणाम दिसून येत आहेत. रत्नागिरी, देवबाग, मालवण या भागांमध्ये ताशी 80- 90 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहत आहेत. वाऱ्यांची ताकद इतकी आहे की यामध्ये उभं राहणंही कठीण झालं आहे. याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली.
तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती.#Tauktae #TauktaeCyclone pic.twitter.com/89r4hAhZEj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 16, 2021
अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या तयारीबाबत माहिती दिली. राज्यात जर तौक्तेवादळ आलंच, तर त्याचा कमीत कमी तडाखा बसावा यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्यात याबद्दल त्यांनी माहिती दिली. मुंबईत रविवार दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबद्दल मुंबई पालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी बैठकीत माहिती दिली.
दरम्यान, रत्नागिरीमध्ये तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात . रत्नागिरी जिल्ह्यात वादळाने प्रवेश केला आहे. राजापूर तालुक्यात जैतापूर, आंबोळगड भागात जोराचा पाऊस आणि वारा आहे. आतापर्यंत तालुक्यात 632नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. दुपारी 2 नंतर रत्नागिरी आणि आसपास वादळचा प्रभाव दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

