मुंबई : ११ वर्षांच्या मोठ्या काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. ४० खेळ प्रकार असणारी हि स्पर्धा २५ सप्टेंबरपासून हंग्झू , झियांग चायनामध्ये खेळवली जाणार आहे.
क्रिकेट सोबतच ई स्पोर्ट आणि ब्रेक डान्सिंगसुद्धा २०२२ च्या या आशियाई खेळांमध्ये पहिल्यांदा समाविष्ट होत आहेत. तर क्रिकेट टी ट्वेंटी स्वरुपात खेळवले जाणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांची त्यात अजून रस घेतील. इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त अँथलीटस ४० क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते. भारतीय क्रिकेट संघाने आशियाई खेळांमध्ये याआधी कधीही भाग घेतलेला नाही. त्यामुळे यंदा ऑलिंपिक खेळांसोबतच क्रिकेटही भारताला पदक जिंकुण देईल अशी आशा क्रिकेट रसिकांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात”
- शिवसेना-भाजप युतीबाबत उतावीळ सत्तारांचे आणखी एक विधान म्हणाले; नितीन गडकरीच बांधू शकतात पूल..!
- कॉंग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले…
- “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे स्वत: जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहून सर्व प्रक्रिया पूर्ण करतील”
- आई झालेल्या अनुष्का शर्माने प्रियंका चोप्राला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

