मुंबई: सध्या मालाड येथील क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान नावावरून चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते राज पुरोहित (BJP leader Raj Purohit)यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (State Minority Minister Nawab Malik) यांनी टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. तर आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leaders Atul Bhatkhalkar) यांनी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
‘टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढले’,’भाजपा टिपू सुलतानला बदनाम करण्याचे काम करत आहे’ असे मंत्री नवाब मलिक म्हणतात. ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात. नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
'टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढले'
'भाजपा टिपू सुलतानला बदनाम करण्याचे काम करत आहे' असे
मंत्री नवाब मलिक म्हणतात.
ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात.
नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे काय? pic.twitter.com/1AgyBfRE46— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 27, 2022
काय म्हणाले होते नवाब मलिक?
“टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. इंग्रजांशी लढत असताना टिपु सुलतान शहिद झाले. इंग्रजांशी लढत असताना कधीही त्यांनी हार मानली नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्या काळात त्यांनी इंग्रजांना हादरुन सोडले होते. मात्र सध्या त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकामध्येही भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला”, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिवसेना-भाजप युतीबाबत उतावीळ सत्तारांचे आणखी एक विधान म्हणाले; नितीन गडकरीच बांधू शकतात पूल..!
- कॉंग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले…
- “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे स्वत: जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहून सर्व प्रक्रिया पूर्ण करतील”
- आई झालेल्या अनुष्का शर्माने प्रियंका चोप्राला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
- कॉंग्रेसच्या नगरसेवकांची राष्ट्रवादीत एंट्री; अजित पवार म्हणतात, येणं जाणं सुरूच राहतं…

