औरंगाबाद: औरंगाबाद दूध उत्पादक संघात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी भाजप-शिवसेना युती घडवून आणली आहे. भाजप-शिवसेना युती साठी सत्तार उतावीळ असल्याचे याआधीही अनेकदा दिसून आले आहे. नितीन गडकरींशी (Nitin Gadkari) झालेल्या भेटीनंतर भाजप-शिवसेना युतीचा पूल नितीन गडकरीच बांधू शकतात. असे विधान काही दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगले होते. मात्र आता पुन्हा एकदा सत्तारांनी सेना-भाजप युतीबाबत वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नितीन गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी पूल बांधण्याचे ठरवल्यास तो कसा जोडायचा हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीचा पूल जोडण्याचे काम त्यांनी मनावर घेतले तर ते नक्कीच ते पूर्णत्वाकडे नेऊ शकतात. असे विधान काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली होती.
आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप मधील युतीसाठी नितीन गडकरीच प्रयत्न करू शकतात. अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार यांनी दिली आहे. याबाबत पुढे ते म्हणाले, नितीन गडकरी हा माणूस गेल्या ३० वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी अशा प्रकारचे वक्तव्य केले. ज्याप्रकारे रस्त्यांवर पूल बांधू शकतात त्याप्रकारे दोन व्यक्तींची मने ते जोडू शकतात. मात्र युतीचा अधिकार माझ्या हातात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच हा निर्णय घेतील. असेही ते म्हणाले. मात्र आता पुन्हा एकदा सत्तारांनी केलेल्या या नव्या विधानानंतर वातावरण तापू शकते.
महत्वाच्या बातम्या:

