मुंबई : कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यातच आता ‘अॅस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर ११ जणांना ‘गिलियन-बार सिंड्रोम’ हा चेतासंस्थेचा दुर्मीळ आजार झाल्याचे दोन वेगवेगळ्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. यामुळे आता देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
यातील सात रुग्ण केरळमधील असून, चार जण ब्रिटनमधील नॉटिंगहॅम येथील आहेत. या सर्वांना हा आजार होण्याच्या दहा ते २२ दिवस आधी लस देण्यात आली होती. ‘गिलियन-बार सिंड्रोम’मध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याच मेंदू आणि मज्जारज्जूच्या बाहेरील चेतासंस्थेवर चुकून हल्ला करते. यााबतचा संशोधन अहवाल ‘जर्नल ऑफ अॅनल्स ऑफ न्यूरॉलॉजी’मध्ये १० जून रोजी प्रकाशित झाला आहे.
दरम्यान आता केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लसीकरण’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तरच आपण कोरोनावर मत करू शकतो, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाबा’, झिवा आणि माहीचा हा क्युट फोटो पाहिला का?
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

