शिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. धोनी आयपीएल स्थगिती नंतर त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत होता. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. आता धोनी रांचीत नसून शिमल्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
शिमल्यात एक फोटो साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला होता. शिमल्यात धोनी आणि झिवा यांचा एक फोटा चेन्नई सुपर किंग्जच्या हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये धोनी उभा आहे आणि त्याला मिठी मारून लहानगी झिवा उभी आहे. हा फोटो सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या या फोटोतला धोनीचा लुक चाहत्यांना फार आवडला आहे. आणि त्यावर चाहते भरभरून कमेंट्स देखील करत आहेत.
???????? Kannane
Kanney ????#WhistlePodu #Yellove ???? pic.twitter.com/aQJPtuZnJg— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 21, 2021
धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल खेळत होता. कोविडचं प्रमाण वाढल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली तेव्हा धोनीची टीम गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी होती. ही स्पर्धा आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार


