🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 2 दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत 2 दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. राज्यात निर्बंध आणखी कडक केले जाऊ शकतात, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
100 टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
मत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांनी अधिवेशनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली- संजय राऊत
- “रद्द परीक्षा, रद्दी सरकार…”, आ. भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
