Share

‘भित्र्या सेलिब्रेटिंनो.. देशाशी प्रामाणिक राहा, सरकारशी नाही’, तेजस्वी यादव संतापले

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनामुळे भारतातील परिस्थिती बिकट झाली आहे. योग्य नियोजन न राबवल्याने विरोधक सतत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अभूतपूर्व संकट निर्माण होऊनही भारतीय सेलिब्रिटींनी मौन धारण केल्याने राजदचे नेते तेजस्वी यादव चांगलेच संतापले आहेत. ‘भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो’ असे म्हणत त्यांनी एक ट्विट केले आहे.

तेजस्वी यादव म्हणालेकी, भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, थोडासा कणा दाखवा, काहीतरी बोला. तुमच्यासाठी पूज्य असलेल्या व्यक्तीच्या चुकीमुळे ऑक्सिजनसारख्या मुलभूत गोष्टीसाठी तुमचे देशबांधव एक दुसऱ्यांच्या जीवांसाठी प्रत्येक सेंकदाला मरत आहेत. तुमचा विवेक कुठे आहे. कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय? देशाशी प्रामाणिक रहा, सरकारशी नाही,” असा हल्लाबोल यादव यांनी केला आहे.

“शेतकरी आंदोलनावरून जेव्हा जगभरातील नागरिकांनी असंवेदनशील सरकारवर टीका केली, तेव्हा सरकारच्या आदेशावरून यांनी देशाचा अतंर्गत मुद्दा असल्याचं सांगत नकली नाराजी व्यक्त केली. आता त्यांची निवडक नाराजी कुठे आहे? सगळीकडे भारतीय मरत आहेत. प्रत्येक क्षणाला मरत आहेत, पण या पोकळ आदर्शांना थोडाही त्रास नाहीये,” अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी भारतीय सेलिब्रिटींना फटकारलं आहे.

काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावेळी सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रेटिंनी विदेशातून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले होते. शिवाय शेतकरी आंदोलन हे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असा मुद्दा मांडला होता. तसेच एरवी छोट्या छोट्या गोष्टींवरून मोदी सरकावर टीका करणारे स्वरा भास्करसारखे लोकही कोरोना प्रश्नावर शांत आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. दरम्यान, तेजस्वी यादव हे पहिल्यापासून मोदी विरोधक असल्याने त्यांच्या या टीकेला कोणी गांभीर्याने घेईल असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!