औरंंगाबाद : संचारबंदी मुळे अवैध धंदे करणाऱ्याना पकडण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करणा-या तीन जणांवर कारवाई करीत पोलिसांनी ५ हजार १४८ रूपये किंमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे.
हर्षदीप मिलिंद वाघमारे (वय २९, रा.भिमपुरा, उस्मानपुरा), कृष्णा लक्ष्मण भालेराव (वय ४०, रा.नागसेननगर, उस्मानपुरा), किसन माणिक गोसावी (वय २४, रा.वाकोद, पाटील गल्ली, जामनेर,जि.जळगांव, ह.मु. गोसावी वाडा, सावंगी-हर्सूल) अशी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणा-यांची नावे आहेत.
त्यांनी नेमकी दारू कुठून आणली आणि कुठे विकणार याची माहिती पोलीस घेत आहे. तिघांविरूध्द अनुक्रमे उस्मानपुरा आणि हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

