Share

IPL मुळे एका रात्रीत बदलले ‘या’ खेळाडूचे जीवन; कधीकाळी २०० रुपयांसाठी खेळायचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २००८ मध्ये आयपीएलचीसुरुवात झाल्यानंतर भारतीय देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या नशिबाने मोठे वळण घेतले. विस्मृतीच्या अंधारात जगणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचे काम आयपीएल केले आहे. या लीगमध्ये भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना परदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळण्याबरोबरच भरपूर पैसा आणि प्रसिद्धीही दिली जाते. आयपीएलमध्ये एका असा खेळाडू आहे ज्याने २०० रुपयांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तर आज आयपीएलमुळे हा खेळाडू करोडोंचा मालक आहे.

ज्या खेळाडूंबाबत असे घडले तो म्हणजे नवदीप सैनी (navdeep saini). उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून, नवदीप खूप घातक गोलंदाज आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने नवदीपला २.६ कोटी रुपयांच्या किमतीत सामील केले आहे. १४० – १४५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणे ही नवदीपची खासियत आहे. नवदीपच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायी आहे, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणारा हा खेळाडू मूळचा कर्नाल, हरियाणाचा आहे. एक काळ असा होता की नवदीपला देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी फक्त २०० रुपये प्रति मॅच मिळत असे. गंमत म्हणजे ही स्पर्धा लेदर ऐवजी टेनिस बॉलने खेळवली जात होती.

नवदीप सैनीच्या क्रिकेट विश्वातील कामगिरीचे श्रेय भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला दिले जाते. कर्नाल प्रीमियर लीगदरम्यान दिल्लीचा माजी गोलंदाज सुनील नरवालने नवदीप सैनीला गोलंदाजी करताना पाहिले आणि गौतमला (gautam gambhir) नवदीपबद्दल सांगितले. यानंतर गंभीरने सैनीला नेट प्रॅक्टिससाठी बोलावले. जिथे या युवा गोलंदाजाने गौतमला आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित केले. यानंतर गौतमने त्याला दररोज सरावासाठी येण्यास सांगितले. सैनी टीम इंडियाकडून खेळला आहे. त्याने भारतासाठी २ कसोटी, ८ एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!