Share

धक्कादायक! किरकोळ कारणावरून चुलत्याने पुतणीचा कोयत्याने कान कापला

Published On: 

बुलडाणा : घरघुती वादातून दिराने आपल्या भावजय आणि तिच्या दोन मुलींवर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील सवणा येथे घडलीय. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये जखमी महिलेच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अधिक असे की, चिखली तालुक्यातील सवणा येथील शारदा वसंता हावरे यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलीय. शारदा हावरे या त्यांच्या दोन मुलींसोबत राहते. शेतात मजुरी करून त्या उदरनिर्वाह करतात. २०१५ मध्ये त्यांचे पती वसंता हावरे यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून आरोपी दिर प्रभाकर हावरे हा त्यांच्या मुलींसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत असे.

दरम्यान, शेजारी महिलेसोबत बोलत असताना प्रभाकर हावरे याने विनाकारण हातात कोयता घेऊन आला आणि मुलीला मारहाण केली.यामध्ये मुलीच्या डाव्या कान कोयत्याच्या पात्याने कापल्या गेला. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतांना शारदा यांच्या हाताला मार लागून जखमी झाल्या. यावेळी दुसरी मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्याने तिच्या सुद्धा कानावर कोयता मारून जखमी केले. या प्रकरणी आरोपी प्रभाकर हावरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!