Share

‘बाळासाहेबांचे विचार एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही, त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते’

Published On: 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू होणार आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन राणे यात्रेला सुरुवात करणार आहेत. मात्र नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाही. असा इशारा विनायक राऊत यांनी दिला होता. दरम्यान भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विनायक राऊत यांना कोत्या मनाने विरोध करू नये असं म्हटले आहे.

‘छोटे दिल से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता’, असा टोला मुनगंटीवर यांनी विनायक राऊत यांना लगावला. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या जागेवर येऊन आशिर्वाद घेत असतील तर कोत्या मनाने आम्ही येऊ देणार नाही, असा विरोध करु नये. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाहीये. त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते. असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

बाळासाहेब राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे ‘शिवतीर्थ’ आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मनं कोती आणि छोटी झाली आहेत. अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!