Share

राज्यातील महाविद्यालयांचा अभ्यासक्रम १ महिना लांबणीवर; राज्य सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरोनाची स्थिती सध्या आटोक्यात आली असली तरी अद्याप महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. तर, मागील काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्यात आला. याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.

दरम्यान, नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!