🕒 1 min read
नवी दिल्ली : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या
आयपीएलमधील खेळाडूंची देवाण-घेवाण आता मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने तब्बल तीन कोटी रुपये मोजत राजस्थानच्या एका अनुभवी खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
राजस्थानकडून गेल्यावर्षी रॉबिन उथप्पा खेळला होता. पण या वर्षी राजस्थानच्या संघाने उथप्पाला संघात कायम ठेवले नाही. पण त्यानंतर तब्बल तीन कोटी रुपये मोजत चेन्नईच्या संघाने उथप्पााला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता उथप्पा चेन्नईकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.
महत्वाच्या बातम्या
- वीज तोडणी प्रकरणी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलनाचा आम आदमी पक्षाचा इशारा
- संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली – अजित पवार
- चीनसाठी मोदींची विशेष पंतप्रधान आवास योजना आहे का? – राष्ट्रवादी
- बीएचआर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ! सुनील झंवर यांच्या मुलाला अटक
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक: कर्डिलेंनी शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
