मुंबई : काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने एक गाव वसवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या ठिकाणी साधारण १०० घरांचा समावेश आहे. या संदर्भात दोन छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिले छायाचित्र २६ ऑगस्ट २०१९ रोजीचे आहे. या तारखेला एकही घर या ठिकाणी नव्हते. मात्र, नोव्हेंबर २०२०मध्ये या ठिकाणी १०० घरे दिसली.
लडाखमध्ये भारताच्या हद्दीत चीनने आधीच घुसखोरी केली आहे. आता तर, चक्क भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास १०१ घरांचे सुसज्ज असं गाव चीनने वसवलं आहे. सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ हे गाव सीमारेषेपासून ४.५ किमी आत अंतरावर वसवले असल्याची माहिती मिळते. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे.
एवढी घरं भारताच्या हद्दीत बांधेपर्यंत कोणाच्याही लक्षात आलं नाही? आणि आलं असेल तर त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही? पंतप्रधान मोदी चीनसाठी विशेष आवास योजना चालवत आहेत का, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्र शासनाला या बाबतीत स्पष्टीकरण द्यावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ग्रामपंचायत निवडणूक निकालांनी राज्य सरकारवरचा जनतेचा रोष दाखवून दिला’
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- विजयाचा आनंद ! मोहम्मद सिराजने केली लक्झरी कार खरेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

