Share

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली – अजित पवार

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे. शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. प्रतिभाशाली कलावंतापासून महान राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्ष देणारा आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्वं, नेतृत्वं, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मरण करुन अभिवादन केले आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे होणार आहे.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड 19 मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!