🕒 1 min read
अहमदनगर:- यंदा कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन नगर जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, शुक्रवारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार निलेश लंके, आ.मोनिकाताई राजळे, माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, शिवाजी कर्डिले, पांडुरंग अभंग, अरुण तनपुरे, अण्णासाहेब म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा नगर तालुक्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी दोन्ही टर्म ते बिनविरोध निवडून आले होते. यावेळी कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यातील 109 सेवा संस्थांपैकी 100 ठराव माझ्या बाजुने झाले असल्याचे आजचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. याही वेळी जिल्हा बॅंकेत विजय माझाच होणार असल्याचे कर्डिले यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे की आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे?’
- दिल्लीतील शेतकरी आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू, रामदास आठवलेंची टीका
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक: लंके, शेळके, तनपुरे, औटी, कर्डिले रिंगणात!
- युजवेंद्र चहलबद्दल ‘ती’ टिपण्णी करणे युवराजला पडले महागात
- ‘ग्रामपंचायत निवडणूक निकालांनी राज्य सरकारवरचा जनतेचा रोष दाखवून दिला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
