🕒 1 min read
नवी दिल्ली: आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
यामध्ये आता प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-9 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जॅग्वार आय-पेससाठी अजून काही आठवडे वाट पाहावी लागेल. कारण ही कार आता 23 मार्च 2021 रोजी लाँच केली जाणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
त्यानंतर आता जॅग्वार लॅंण्ड रोव्हरच्या भविष्यातील केबिन एअर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाने चाचण्यांमध्ये जवळपास 97 टक्क्यांपर्यंत अंतर्गत विषाणू आणि हवेतील जीवाणूंचा खात्मा करण्यात सक्षमता दाखवली आहे.
प्रोटोटाईप हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग यंत्रणेत पॅनासोनिकच्या नॅनो एक्स तंत्रज्ञानाचा वापर घातक विषाणूंचा खात्मा करण्यासाठी केला आहे. याचा उपयोग भविष्यात जॅग्वार आणि लँड रोव्हर मॉडेल्सना एक खास ग्राहक अनुभव देता येण्यासाठी केला जाईल. एक नावीन्यपूर्ण प्री कंडिशनिंग फीचरही यात उपलब्ध आहे, जेणेकरून ग्राहकांना वाहनात बसण्यापूर्वी ही यंत्रणा सुरू करता येईल.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
