Share

औरंगाबाद मनपा निवडणुक : सर्वोच्च न्यायालयात होणार २० एप्रिल रोजी सुनावणी

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यंतरी वॉर्ड आरक्षणावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. ९ मार्च रोजी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारसमोर ठेवण्यात आले होते. मात्र वेगवेगळ्या प्रतिवादींनी आपले शपथपत्र अजूनपर्यंत दाखल केलेले नाही. आता रजिस्टारने सुनावणीसाठी २० एप्रिल ही पुढची तारीख या प्रकरणी दिली आहे.

महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आता रजिस्टार यांच्याकडे २० एप्रिल रोजी सुनावणी असून अद्यापपर्यंत चार महत्त्वाची शपथपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत. राज्य शासनाला चार आठवड्यात, तर राज्य निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे.

औरंगाबाद पालिका निवडणुकीची जाहीर झालेली प्रभाग रचना व वॉर्ड आरक्षण यावर समीर राजूरकर यांच्यासह इतरांनी सुप्रीम अर्थातच सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेत विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र त्यानंतर एकदाही प्रकरण न्यायालयासमोर आलेले नाही. याचिकेतील वेगवेगळ्या प्रतिवादींनी आपले शपथपत्र अजूनपर्यंत का दाखल केले नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासन हे सरकारच्या हातचे बाहुले असल्यासारखे काम करीत असल्याचा आरोप इच्छुक उमेदवार करत आहेत

प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्याची संधी न्यायालयाने दिली आहे. आतापर्यंत फक्त महापालिका आयुक्त, महापालिका उपायुक्त महसूल, विभागीय आयुक्त यांनी शपथपत्र दाखल केले आहेत. राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी शपथपत्र दाखल केले नाहीत.

राज्य निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याची शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे. रजिस्टार यांच्याकडे महिनाभरात कोणाकोणाची शपथपत्र दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर प्रकरण न्यायालयासमोर जाईल, अशी सूत्रांनी माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!