Share

आता कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, भारतीय बनावटीचं पीपीई कीट झाले तयार

Published On: 

गुजरात : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेडिकल साधनांची गरज आहे.  तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट देखील मोठ्या प्रमाणत लागत आहेत. यासाठी भारताला अनेक पीपीई कीट आयात करावी लागत आहेत. परंतु  आयात केलेले कीट हे बनावट लागत असल्याचा अनुभव येत आहे.

मात्र आता गुजरातमधील वडोदरामधील एका कंपनीने भारतीय बनावटीचं पीपीई किट तयार केलं आहे. आपल्याकडे असलेल्या पीपीई किटची कमतरता आणि बाहेरून मागवलेले काही किट निकृष्ट दर्जाचे निघाल्यानंतर आता भारतात स्वदेशी पीपीई किट तयार करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता.

वडोदराच्या कंपनी शोर सेफ्टी (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार हे किट केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय सैन्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या किटमधील सूट हा पॉझिटिव्ह एअर प्रेशन चालवला जातो. सूटमधील हवेच्या गुणवत्तेचं मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीनं केलं जातं. हे पीपीई सूट डिस्पोजेबल नाही. म्हणजे एकदा वापरा टाकून द्या असे ही सूट नसल्यानं त्याचा कचरा होणार नाही आणि संसर्गाचा धोका होणार नाही. हे किट कोरोनाचा संसर्गापासून 100 टक्के दूर ठेवेल, असा दावा कंपनीने केला आहे.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!