Share

Sushma Andhare | “गुजरातला मुख्यमंत्री आहेत की” ; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | कोल्हापूर : शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) हल्लाबोल करत आहेत. अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. ही आश्वासनांती खैरात आता हवेत विरून गेली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक प्रोजेक्ट हा गुजरातमध्ये जात आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र मागील काळात झालं, असे म्हणून त्याची सारवासारव करत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे की गुजरातचे. गुजरात आमचाच भाऊ आहे. आमच्याच देशाचा भाग आहे. पण गुजरातला मुख्यमंत्री आहेत की तुम्ही कशासाठी जास्तीचा भार उचलत आहात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

“जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कंगाल करण्याचा, महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. राजकीय अस्थिरता निर्माण झाली की सहाजिकचं उद्योगपतींना इथं गुंतवणूक करावी वाटणार नाही. देशाची राजधानी मुंबईचा मान कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे बेरोजगारांची संख्या वाढेल. हे भाजपचं अत्यंत घाणेरडे, कुटील महाराष्ट्रद्रोही धोरण सुरु आहे. हे धोरण लोकांसमोर उघडे पाडणे, आमचा हेतू आहे”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या काळात भेट देत नव्हते असा आरोप शिंदे गटातील आमदारांचा आहे, याचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “दोन वर्ष आपल्याकडे कोरोना होता. क्वारंटाईन राहणे, आयसोलेशनमध्ये राहणे हीच त्या आजाराची पूर्वअट होती. कुणी कोणाच्या संपर्कात जायचं नाही, ही अट होती. पण एका ठीकाणी बसून उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी जे काम केले ते उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथ (Adityanath) यांना सुद्धा जमले नाही. आदित्यनाथ यांच्या काळात ऑक्सिजन उपलब्ध नव्हते, बेड मिळत नव्हते आणि प्रेत नदीवर तरंगत होती. तेव्हा महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं. जागतिक आरोग्य संघटनेने त्याची दखल घेतली. टॉप ३ मध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव होते.”

“मात्र आमचे एकनाथ भाऊ घरात नसतात ते घाराच्या बाहेचरं असतात. ते इतके घराच्या बाहेर असतात की केसरकर भाऊ म्हणातात त्यांना सलाईन लावावे लागते. ते घराच्या बाहेर असतात पण ते मंत्रालयाच नसतात. ते गणपतीची आरती करतात. ते दांडीया खेळायला जातात. ते श्राध्दाचं जेवायला जातात. ते दिल्लीला हुजरे-मुजरे करायला जातात. त्यातून वेळ मिळाला तर ते गुवाहाटीला कामाख्याला जातात. ते घरात नसतात,” असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले होते. सुषमा अंधारे म्हणाल्या, “जर आम्हाला उमेदवार मिळणार नसेल तर तुम्ही काळजी नाही आनंद देखील व्यक्त केला पाहीजे. पण तुमची लेकरं उघडी-पागडी रस्त्यावर फिरत आहेत. त्याच्याकडे तुम्ही बघत नाही. आमची लेकरं घेऊन त्यांना काजळ, पावडर करत आहात ते बंद करा, आमच्याकडे उमेदवार येणार की नाही हे काळ ठरवेल. ४० गेले तरी त्याच्या दुप्पट आमदार आणण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!