Share

NCP | “गुजरातला फाॅक्सकाॅन अन् महाराष्ट्राला पाॅपकार्न”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

NCP | मुंबई : राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर विरोधक बोलण्याची एक संधी सोडत नाहीये. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची सभा पार पडली. या सभेत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मंथन शिबिरात बोलत असतांना छगन भुजबळ यांनी फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेंव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणु असे म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नसल्याचं देखील निदर्शनास आणून दिलं आहे.

राज्यातील प्रकल्प गुजरात गेल्याच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी गुजरातला फॉक्सकॉन आणि महाराष्ट्राला पॉपकॉन असा टोला लगावत जहरी टीका केली आहे. तसेच फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबस चा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बस चा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला असं म्हणत भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारचा समाचार घेतला.

यादरम्यान, महाराष्ट्रामधील रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात असल्याचे सांगत, मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिल्याचे भुजबळ म्हणाले. याशिवाय टाटा यांना पत्रात म्हंटलं होतं की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएल च्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा अशी मागणी केली होती, असं देखील भुजबळांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचा दावा भुजबळांनी मंथन शिबिरात करत आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला असा टोला लगावत भुजबळांनी घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!