Share

कोरोनामुक्त झाल्यानंतर कंगनाने कुटूंबासह पहिल्यांदा घेतले सुवर्ण मंदिरचं दर्शन

Published On: 

अमृतसर : अभिनेत्री कंगना रनौत कोरोनामुक्त झाल्यानंतर तिच्या कुटूंबासह वेळ घालवताना दिसत आहे. नुकतंच तिने काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. यात ती तिच्या कुटूंबासोबत दिसून आली. तिने तिच्या कुटूंबासह सुवर्ण मंदिरचं दर्शन घेतलं आहे. याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कंगनाने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून, हे फोटोज शेअर करताना तिने कॅप्शन लिहिलं, ‘आज मी श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिरमध्ये गेली होती. जरी मी उत्तर भारतात लहानाची मोठी झाली असली तरी माझ्या कुटूंबातील सगळेच जण कित्येकदा या मंदिरात येऊन गेले आहेत. फक्त माझी याठिकाणी येण्याची ही पहिली वेळ होती. सुवर्ण मंदिरचं सौंदर्य आणि दिव्यता पाहून मी निःशब्द आणि आश्चर्य झाले.’ यावेळी अभिनेत्री कंगना रनौत पारंपारिक सलवार सूटमध्ये दिसून आली. तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CPhWV7zBhin/?utm_source=ig_web_copy_link

कंगना रनौत तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच ती मानलीमध्ये तिच्या घरी गेली होती. त्यानंतर तिने सुवर्ण मंदिराला भेट दिल्यामुळे तिची पुन्हा एकदा चर्चा होत असल्याचे दिसत आहे. सध्या कंगनाचाआगामी ‘थलाइवी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तिचा हा चित्रपट गेल्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतू कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!