Share

‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान 

Published On: 

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढू नये. शरद पवार यांच्यावर मध्यल्या काळात शस्त्रक्रिया झाल्या. म्हणून ही केवळ त्यांची सदिच्छा भेट होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सोमवारी ( ३१ मे ) दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ही भेट नेमकी कशासाठी असे म्हणत राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही केवळ सदिच्छा भेटच होती, असे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सायंकाळी जालना दौऱ्यावर आले असता, शरद पवार यांच्यासोबत आपली काय चर्चा झाली, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्यूएस आरक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठीचे आदेश काढले, त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या समाजाला इतर कुठल्याही प्रवर्गाचे आरक्षण नाही, त्यांना अशा प्रत्येक प्रवर्गाला आरक्षण लागू आहे. त्यामुळे यात नविन काहीही नाही. मराठा समाजाचे एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ऑटोमैटिकली ईडब्यूएस अंतर्गत १० टक्के आरक्षणासाठी ते पात्र आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!