इंग्लंड : दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. यापूर्वीच इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट स्पर्धेतही कोरोनाची एन्ट्री झाली आहे.
या स्पर्धेत बर्मिंगहॅम बिअर्स टीमकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कार्लोस ब्रेथवेट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे आता सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सावटाखाली कडक निर्बधांचे पालन करत हे सामने खेळवले जात आहेत. तरी देखील भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपुर्वी इंग्लंडच्या मैदानावर कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
ब्रेथवेट या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत 9 मॅचमध्ये 13.33 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रेथवेटनं तीन दिवसांपूर्वीच यॉर्कशर विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्याने 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- बाग आहे की शेत? पहा काय-काय पिकवते प्रीती झिंटा बागेत
- ‘…हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही’ ; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक
- मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, व्हिडिओद्वारे सांगितलं सुसाईडचे कारण
- बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

