Share

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती भयावक ; कोरोना रुग्णांचा आजचा आकडा चिंताजनक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात आज ८ हजार ६२३ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर, काल पेक्षा आज कमी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसांभारात ३ हजार ६४८ कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. दरम्यान, एकूण २० लाख २० हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये रोज आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!