Share

कोरोना बाधित रुग्णांना मिळेना रेमडीसीवीर इंजेक्शन, आ.जगताप यांचे आरोग्यमंत्री टोपे यांना साकडे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील रेमडीसिवीर या इंजेक्शनचा साठा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माहितीनुसार संपला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहे.

त्यामुळे ह्या इंजेक्शनचा पुरवठा त्वरीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे काल केली आहे. काल आ.संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले आहे.

आ.संग्राम जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयातील रेमडीसिवीर या इंजेक्शनचा साठा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माहितीनुसार संपला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हे इंजेक्शन नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी निवेदनात आ.जगताप यांनी केली आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यात ह्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त रेमडीसिवीरचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.जगताप यांनी केली आहे. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ वैद्यकीय सचिवांना त्वरित जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत आदेश दिला.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!