Share

अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात १८ मृत्यूसह ९०० कोरोना बाधित रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ९०० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ हजार १५९ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३३ हजार ३८१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६३२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ४२, पाथर्डी ९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, नेवासे ५, श्रीगोंदे ६, पारनेर ३, राहुरी ३, कोपरगाव ३ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४०, संगमनेर १४, राहाता १९, पाथर्डी ६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपुर ३४, नेवासा ११, श्रीगोंदे २, पारनेर २३, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव ३, कोपरगाव १० आणि जामखेड ८ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत काल ६०० जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा १६२, संगमनेर ४४, राहाता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदे १६, पारनेर ३१, अकोले ३१, राहुरी २३, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!