🕒 1 min read
हिंगोली : गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. २०२० वर्ष तर कोरोनामुळे वाया गेले. यंदा तरी नवीन काहीतरी घडेल असा सर्वांचा अंदाज होता. पण आता तर गत वर्षी पेक्षा अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन अनेकांचा मृत्यू झालाय. पण अनेकांना कोरोनाच्या भीतीने ग्रासलेय. रोजगार, उदरनिर्वाह, कर्ज यासारखे विविध प्रश्न आ वासून समोर उभे आहेत. व्यक्ती तितक्या समस्या असे सध्या वातावरण आहे. यामुळे अनेकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झालीये. यातून काही जण टोकाचं पाऊल उचलत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा गावात अशीच एक घटना घडली आहे. कोरोना काळ आणि त्यात लग्नही जमत नसल्याने नैराश्यातून युवकाने आत्महत्या केली. काल रविवारी पहाटे त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन गोविंदराव गायकवाड असं संबंधित मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या आई वडिलांसोबत राहात होता.
काही दिवसांपासून अनेक प्रयत्न करूनही लग्नासाठी नवरी मिळत नव्हती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या तरुणाचा लॉकडाऊनमुळे आणखी एकटेपणा वाढला. लग्न जमत नाही आणि त्यात कोरोनाचा काळ या दुहेरी परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या सचिनने गळफास घेऊन स्वतःला संपवलं.
सकाळी त्याच्या आईवडिलांना हा प्रकार पाहून धक्काच बसला. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताचे नातेवाईक अर्जुन गायकवाड यांच्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रत्यर्पण टाळण्यासाठी फरार नीरव मोदीने केली ‘ही’ नवीन खेळी
- संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे चार आरोपी अटकेत, इतर समाजकंटक फरार
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
