Share

कोरोना थांबेना : दिल्लीत लॉकडाऊन वाढवला; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अशातच, भरमसाठ होत असलेल्या रुग्णवाढीमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. देशातील परिस्थिती भीषण बनत चालली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा देखील मिळत नसल्याचे चित्र आहे.

दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यात दिल्लीमध्ये 65,180 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी 4 मेपासून प्रति दिन 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू 3 मेरोजी झाले होते. त्यावेळी शहरात 448 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाच्या या वाढत्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. राजधानीत आता 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, निर्बंध शिथील करण्यात आलेले नसून निर्बंध कायम असणार आहेत. अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा आकडाही चार हजारांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 311,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!