बीड: काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. देशभरातून भावना व्यक्त होत आहे, मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता आज आपल्याला सोडून गेला आहे तसेच सामान्य समाजासाठी एक तरुण उमदा नेता राजीव सातवच्या रुपाने आज आपण गमवला आहे. राजीव सातव सारख्या उमदा तरुण बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात, अशा भावना भाजपचे नेत्या पंकजा मुंडेनी व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडीया द्वारे त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात त्या म्हणाल्या, ज्याने आपले आयुष्य कष्टामध्ये घालून जेव्हा एका उंचीवर पोहचतो आणि त्या उंचीवरुन अनेक जणांना स्पर्श करत आसतो अशा प्रवासाचं उदाहरण असलेल्या राजीव सातवांचा आज या कोरोनाने जीव घेतलाय. मी मनापासून दुख व्यक्त करते. तसेच सातव परीवाराच्या दुखामध्ये समस्त मुंडे परीवार दुखी आहे. अशी भावना पंकजा मुंडेनी या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
आज कॉंग्रेसने एक तरुण उमदा नेता गमावला असून मुंडे साहेबांचा लाडका राजु हा सुध्दा गमवला आहे. राजीव सातव हा खूप लाडका मुंडे साहेबांचा एक युवक होता. मुंडे साहेबांना वाटायचं युवकांना आपण चागलं सहकाऱ्या करायचं, पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करायचं चागलं काम करणाऱ्या युवकांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. राजीवजींचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि आज त्यांच्या जाण्याने खूप मोठे नूकसान झाले तसेच मोठी पोकळी निर्माण झाली आहे, मी भावपुर्ण श्रांध्दाजली व्यक्त करते.आणि मनापासून दुःख व्यक्त करते, असे पंकजा मुंडेनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू ; मायकल वॉनची अशी घेतली शाळा
- औरंगाबादेत म्युकरमायकोसिसने घेतला ‘एवढ्या’ रुग्णांचा बळी!
- मराठा समाजाच्या युवकांकडून मराठा आमदार-खासदारांचे पिंडदान
- मोठी बातमी : अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने, रेड अलर्ट जारी
- दुखापतीमुळे आर्चर त्रस्त, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका खेळण्याबाबतचे शंका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

