Share

कोरोना व्हायरस म्हणतोय, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचारावरून राज्य सरकारवर आरोप केले होते. ‘WHO ने कौतुक केल्यानंतर राज्य सरकारने स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली मात्र देशातील 34 टक्के मृत्यू राज्यात झाले आहे. देशातले 46 टक्के रुग्ण राज्यात आहे. कोरानाबाबत काय चाललंय काही कळत नाही. रुग्ण संख्या खरंच वाढली की अजून काही आहे हे कळत नाही. अमरावतीत लोकांना विचारलं जातंय की अहवाल पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह ? कोणी मंत्री, अधिकारी जातात आणि लॉकडाऊन करतात. छोट्या व्यापाऱ्यांना काही मदत करणार आहात का? अमरावतीत लॉकडाऊन का केलाय?’ असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

फडणवीसांच्या या सवालांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ‘राज्यात कोरोनाचा संस्ग्र पुन्हा वाढतोय. कोरोना व्हायरस म्हणतोय, “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” ‘ असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा अधिक आहे, कारण त्यात कोणतीही लपवाछपवी नाही. सर्व रुग्णांचे आकडे हे पारदर्शक आहे. मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाही,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!