🕒 1 min read
अहमदाबाद : कालपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या, टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वयाने ज्येष्ठ असलेल्या अनेक नेत्यांनाही लस देण्यात येत आहे.
देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लाखो लोकांनी विविध रुग्णालये व केंद्रात जाऊन लस घेतली. मंगळवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोरोना लस घेतली.
१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. रवी शास्त्री यांनी मंगळवारी ही लस घेतली आणि त्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
Got the first dose of COVID-19 vaccine. Thank you to the amazing medical professionals & scientists for empowering India ???????? against the pandemic.
Extremely impressed with the professionalism shown by Kantaben & her team at Apollo, Ahmedabad in dealing with COVID-19 vaccination pic.twitter.com/EI29kMdoDF
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 2, 2021
त्यांनी लिहिलं की,”आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यानं जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो.”
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
